पुसेसावळी/औंध : राजाचे कुर्ले ता खटाव येथील डोंगरपायथ्याजवळ एका कपंनीने कामासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या सात संशयितांना औंध पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तनवीर अल्ली पटेल (वय ३१ रा. वाघेरी. ता. कराड), मुबीन युनूस पटेल (२७ रा. ओगलेवाडी ता. कराड), गौरव अंकुश वाघमारे (२३), सागर राजाराम वाघमारे (३०), सागर दत्तात्रय कुंभार (२५ तिघेही रा.वडोली निळेश्वर ता. कराड), सुनील ताराचंद चव्हाण (२० रा. उत्तरकार्ले ता. कराड), दीपक राजेंद्र सोनवणे (२९रा. मसूर ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, ८ नोव्हेंबर रोजी रात्री राजाचे कुर्लेच्या डोंगरपायथ्याजवळून दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित तनवीर अली पटेल (रा. वाघेरी ता. कराड) यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान पटेल याने याप्रकरणात अन्य सहा जणांचा सहभाग असल्याची कबुली दिली. त्यानंतर औंध पोलिसांनी अन्य सहाजणांना ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वापरलेली टाटा ट्रक, ट्रेलर, पीकअप, दुचाकी, गॅस कटर, सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर, ७ मोबाईल आणि चोरीला गेलेले लोखंडी पोल असा एकूण ३० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठीकणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस हवालदार राहुल वाघ, रवींद्र बनसोडे, महेश जाधव यांनी पार पाडली.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |