08:50pm | Nov 19, 2023 |
सातारा : उंब्रज मधील दोन युवकांकडून एक देशी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सुदर्शन किरण पाटील रा. आटके, ता. कराड आणि मिथिलेश मारुती महिंदकर रा. मलकापूर, ता. कराड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेत.
दि. 18 नोव्हेंबर रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वासनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, दोनजण मसूर फाटा येथे बेकायदेशीर गावठी कट्ट्याची विक्री करण्याकरता येणार आहेत. ही माहिती देवकर यांनी पतंग पाटील व अमित पाटील आणि त्यांच्या पथकास देऊन त्यांना संबंधितांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या तपास पथकाने मसूर फाटा, उंब्रज, ता. कराड येथे जात सापळा लावून माहिती मधील दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांचे अंगझडती घेतली असता एकाच्या ताब्यात एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 40 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. हे दोघे जवळील गावठी कट्टा विक्री करण्याकरता घेऊन आल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून आत्तापर्यंत एकूण 64 देशी बनवतीचे कट्टे व 168 काडतुसे आणि 377 रिकाम्या पुंगळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, सचिन साळुंखे, सनी आवटे, अरुण पाटील, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्निल कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, प्रवीण पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, केतन शिंदे, वैभव सावंत, संकेत निकम, शिवाजी गुरव, पंकज बेसके, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सहभाग घेतला.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |