नवी दिल्ली व्हॉट्सॲप स्कॅम : व्हॉट्सॲप वर एक नवीन प्रकारचा स्कॅम सध्या सुरू आहे ज्यामध्ये युजर्सना गंडा घालणारे एखाद्या यूएस कंपनीशी जोडले जाण्यास सांगतात आणि लोकांना खोटे नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या जाळ्यात अडकवत आहेत. स्कॅमर लोकांना कॉल करण्यासाठी आणि एसएमएस करण्यासाठी यूएस मोबाइल नंबर वापरत आहेत. या घोटाळ्यात स्कॅमर्स संबधित नोकरीत बॉस किंवा मोठ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं सांगून आपल्या जाळ्यात ओढत असतात. IANS च्या रिपोर्टनुसार, मुख्य शहरातील एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अनेक बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स आले. घोटाळे करणारा स्वत:ला एका मोठ्या कंपनीचा अधिकारी सांगत होता आणि कामाशी संबंधित व्यक्तीशी बोलण्याची परवानगी मागतो. स्कॅमर्स लोकांना मेसेज देखील पाठवत आहेत ज्यात असे लिहिले आहे - 'तुम्ही मोकळे होताच मला कॉल करा..' अहवालात असे म्हटले आहे की बनावट कॉल अटलांटा, जॉर्जिया आणि +1 (404) कोडसह अमेरिकन नंबरवरून होते. शिकागो, इलिनॉयचा +1 (404) कोड +1 (773) अशा नंबरवरुन कॉल येत असतात. सुरक्षित राहण्यासाठी काय कराल? गेल्या महिन्यात भारतातील अनेक लोकांना परदेशी नंबरवरून अनेक कॉल आणि एसएमएस आले होते. यानंतर व्हॉट्सॲपने कारवाई करत असे सर्व नंबर ब्लॉक करण्यास सुरुवात केली. घोटाळेबाज बनावट कॉलर आणि कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांना फसवतात आणि नंतर त्यांचे पैसे आणि वैयक्तिक माहिती चोरतात. तुमच्यासोबत हे सर्व घडू नये म्हणून, नेहमी आधी समोरच्या व्यक्तीची पडताळणी करा आणि त्यानंतरच कोणतेही तपशील शेअर करा. व्हॉट्सॲप च्या सर्व गोपनीयता सेटिंग्ज जसे की 2FA, अनोळखी नंबरवरून सायलेंट कॉल इत्यादी चालू ठेवा जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहाल. जर तुम्हाला परदेशी नंबरवरून कॉल आला तर तो उचलू नका किंवा मेसेजला उत्तर देऊ नका किंवा लिंकवर क्लिक करू नका. तत्काळ तक्रार करा आणि अशा क्रमांकांना ब्लॉक करा.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |