08:42pm | Nov 19, 2023 |
सातारा : सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. धरणसाठ्यातही पाण्याची पातळी कमीच आहे. आज विज निर्मितीसाठी पवनचक्कीचा वापर करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे विशेषत: कोयनेतील उपलब्ध पाण्याचा विचार केला तर यामध्ये दोन हजार वीज मेगॉवटसाठी जे पाणी लागते त्यानंतर उर्वरीत पाणी हे समुद्राला जात आहे. ते काही काळासाठी कोयनेतील वीजनिर्मिती बंद करुन ते पाणी जिल्ह्यातील शेती, जनावरे अन पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी शासनाकडे केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीत नव्याने पदधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रविवारी केल्या आहेत. या नियुक्त्या आगामी निवडणुकांमध्ये नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सामान्य लोकांपर्यंत भाजपची विकासकामे, ध्येयधोरणे व उपक्रम घरा-घरात पोहोचवून पक्ष बळकट करावा, म्हणून करण्यात आले असल्याचे धैर्यशील कदम यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आदी उपस्थित होते.
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच भासणार आहे. कारण सद्यस्थितीत धरणांमध्ये पाण्याची पातळी फारच कमी आहे. कोयना धरणाचे पाणी कर्नाटकच्या नदीला सोडले तर आम्हांला इकडे शेती आणि पिण्याला पाणी कमी पडण्याची शक्यता आहे. कोयना धरणावर दोन हजार मेगॉवॅट वीज तयार करण्यात येत असते. त्यानंतर ६४ टीएमसी पाणी हे विनावापर समुद्राला सोडण्यात येत असते. वीज निर्मितीनंतर कोयनेतून जे पाणी समुद्राला जात आहे. त्यामुळे १ हजार मेगॉवॅटची वीजनिर्मिती काही काळ थांबवण्यात यावी. कोयनेचे पाणी सांगली आणि कर्नाटकसाठी दिले जाते. ते पाणी टेंभू, सांगोलापर्यंत देण्यात येत आहे. त्यामधील ३२ टीएमसी पाणी जर कोयनेतून दिले तर ताकारी, म्हैसाळ आणि कर्नाटकच्या वाट्याला लागणारे दिले तर धोम, बलकवडी, तारळीमधून जे पाणी सोडतो ते सर्व पाणी सातारा जिल्ह्यातील एरिकेशनला वापरावे. कोयनेतून इलेक्ट्रीक सीटीचा वापर काही काळ थांबवून ते पाणी शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापरले तर जे जिल्ह्यावर पाण्याचं मोठं संकट आले आहे, ते यामधून पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकणार असल्याचे धैर्यशील कदम यांनी सांगितले.
वीज निर्मितीसाठी आज सातारा जिल्ह्यात पवनचक्कीसारखा पर्याय आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील आजच्या पाणी टंचाईचा विचार करता कोयनेतील पाणी शेती आणि पिण्यासाठी व जनावरांसाठी वापरण्यात यावे, अशी आमची आज शासनाकडे मागणी आहे. ही मागणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पाण्याची टंचाईचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याचे मत धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |