10:37pm | Nov 20, 2023 |
सातारा : खटाव तालुक्यात रहाटणी येथे पुनर्वसन झालेल्या भानसेवाडी ता. खटाव येथील ग्रामस्थांनी नागरी सुविधा द्याव्यात व स्थलांतरित न झालेल्यांचे भूखंड परस्पर विक्री होणे त्वरित थांबवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याबाबतची दखल घेऊन समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा शिवसेनाप्रमुख सचिन मोहिते, अशोक भानसे, हणमंत भानसे, निलेश भानसे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भानसेवाडी ता. खटाव येथे ग्रामस्थांचे उरमोडी धरण प्रकल्पामुळे रहाटणी ता. खटाव या ठिकाणी पुनर्वसन झालेले आहे; परंतु गेले कित्येक वर्षे विस्थापित होऊनदेखील ग्रामस्थांना बऱ्याच नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. भानसेवाडीसह कासरस्थळ गावचेही या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे; परंतु त्या गावातील बहुतांशी खातेदार स्थलांतरित झालेले नाहीत. काही लोक त्यांचे भूखंड परस्पर विक्री करीत आहेत. त्यामुळे गावातील स्थानिक व बाहेरील क्षेत्र विकत घेऊन येणाऱ्या लोकांमध्ये भविष्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कायदेशीरदृष्ट्या भूखंडाचा वापर न करता परस्पर विक्री करणे चुकीचे आहे. या सर्व गोष्टी त्वरित थांबविण्यात याव्यात व आम्हाला सर्व नागरी सुविधा पर्याय देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याची दखल घेऊन समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |