02:16pm | Nov 24, 2022 |
पुणे : सर्वधर्म समभाव हा शिवरायांचा विचार होता. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या धर्माचा, पंथांचा त्यांनी आदर केला. त्यांनी सामाजिक सौहार्द टिकवला. देव आपण कुणी पाहिला नाही. शिवाजी महाराज हे देवापेक्षा कमी नव्हते. देश अखंड ठेवायचा असेल तर शिवरायांचे विचार आवश्यक आहे, असं उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं. अशा प्रवृत्तींना ठेचून काढेल पाहिजे. पक्ष वगैरे बघणार नाही, येत्या 28 तारखेला पुढची भूमिका जाहीर करेन, असा थेट अल्टिमेटम खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपाला दिला आहे.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी कोश्यारी व त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर प्रचंड संताप व्यक्त केला ते म्हणाले, शिवरायांचं विचार जुना झाला हे कोश्यारींचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला तीव्र संताप आला. त्यांच्या वक्तव्याचं आश्चर्य वाटलं. याधीही त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये केली आहेत. शिवराय अनेक महापुरुषांचे स्फूर्तीस्थान होते. मग आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या शिवरायांचे विचार जुने कसे?, असा सवाल करत राज्यपाल कोश्यारींना पदावरुन मुक्त करावा, असा आक्रमक पवित्रा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला.
शरद पवार, नितीन गडकरी यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही
भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदाची बुद्धी भ्रष्ट झाली की काय? लाज वाटत नाही का या लोकांना..शिवरायांनी माफीनामा लिहून दिला, याला पुरावा काय? असे सवाल करत त्रिवेदी-कोश्यारी जोडगोळीवर उदयनराजे तुटून पडले. तसेच मंचावर उपस्थित शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवालही उदयनराजे यांनी विचारलं. सर्वधर्म समभाव हा शिवरायांचा विचार होता. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या धर्माचा, पंथांचा त्यांनी आदर केला. त्यांनी सामाजिक सौहार्द टिकवला. देव आपण कुणी पाहिला नाही. शिवाजी महाराज हे देवापेक्षा कमी नव्हते. देश अखंड ठेवायचा असेल तर शिवरायांचे विचार आवश्यक आहे, असं उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं. अशा प्रवृत्तींना ठेचून काढेल पाहिजे. पक्ष वगैरे बघणार नाही, येत्या 28 तारखेला पुढची भूमिका जाहीर करेन.
....तर शिवाजी महाराजांचा विचार सोडून चालणार नाही
शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्यासाठी नव्हे सर्व लोकांना धर्मातील लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला. शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडली होती. सर्वधर्म समभाव हीच स्वराज्याची संकल्पना त्यावेळी शिवाजी महाराजांनी मांडली. महाराजांनी प्रत्येक जातीधर्मातील लोकांचा सन्मान केला. प्रत्येक धर्मातील लोकांचा आदर केला. इतिहासात वळून पाहिलं त्यातून बरंच काही घेण्यासारखं आहे. असं सगळं असताना महाजारांचा अवमान करण्याचं कारण काय? असा सवाल करत राज्यपाल कोश्यारींना माझा विरोध नाही. माझा विरोधात कोश्यारींसारख्या प्रवृत्तीला आहे, असं उदयनराजे म्हणाले.
भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. भारतात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतायेत. या लोकांना एकत्र ठेवायचे असेल तर सर्वधर्मसमभावाचा विचारांची ज्या शिवाजी महाराजांची मांडणी केली होती त्या आधारावरच देश अखंड राहू शकतो. लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांचा विचार सोडून चालणार नाही, असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितलं.
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |