09:37pm | Sep 22, 2023 |
सातारा : टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स (टाटा एआयए) ही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी असून, सर्वाधिक एमडीआरटी पात्र सल्लागार असलेली जगातील पाचव्या क्रमांकाची इन्श्युरन्स कंपनी ठरली आहे. कंपनीने १ जुलै २०२३ रोजी एमडीआरटी (मिलियन डॉलर राउंड टेबल) लीगमध्ये १९७८ पात्र सल्लागारांची नोंद केली आहे.
एमडीआरटी पात्र सल्लागार हे या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट समजले जातात. जीवन विमा क्षेत्रात त्यांच्याकडे उत्तम ज्ञान आणि त्यात ते कुशल असतात. ग्राहकांना उत्तम आणि योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम माहिती असते. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार विमा योजना मिळते. आणखी एक अभिमानाची गोष्ट ही की एमडीआरटी पात्र महिला सल्लागारांच्या संख्येतही (९३६) टाटा एआयए जागतिक पातळीवर नववी कंपनी तर देशात अव्वल कंपनी ठरली आहे. कंपनीने पहिल्यांदाच या वर्गात जगातील पहिल्या दहा कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर अमित दवे म्हणाले की, टाटा एआयए सल्लागारांची जागतिक पातळीवर नोंद झाली आणि त्यांना सन्मान मिळाले हे पाहाणे मी माझे भाग्य मानतो. टाटा एआयएच्या ग्राहकांंना सल्लागारांचा उत्तम सल्ला मिळावा आणि सर्व पातळीवर त्यांना चांगला अनुभव यावा यावर आमचा भर असतो. हे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या सल्लागारांना या उद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ट्रेनिंग, विकासासाठी सहाय्य आणि करीअर घडवण्याची संधी देतो. सल्लागारांच्या जाळ्यासह आम्ही प्रत्येक भारतीयाला जीवन विम्याचे कवच मिळून त्यांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करता याव्या यासाठी काम करत आहोत.
वित्तवर्ष २३ मध्ये महाराष्ट्रात टाटा एआयएने १८,७६७ नव्या ग्राहकांना विमा योजन दिली आहे. त्यातून २५७.९ कोटी रुपयांचा एकूण नवा व्यवसाय प्राप्त झाला आहे. वित्तवर्ष २३ मध्ये कंपनीने ४६४५ नवीन परवानाधारक सल्लागार राज्यात नेमले आहेत आणि ३० जून २०२३ पर्यंत विमा सल्लागारांची संख्या ८२४२ झाली आहे. ९५ टक्के सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रमाण कायम ठेवत टाटा एआयए महाराष्ट्रात ग्राहकांना सर्व महत्त्वाच्या उत्तम सेवा देत आहे.
एमडीआरटी ही जगभरातील आघाडीचे जीवन विमा आणि वित्तीय सेवा प्रोफेशनल्सची जागतिक संघटना आहे. यामध्ये ७० हून अधिक देशातील ५०० हून अधिक कंपन्यांमधील प्रोफेशनल्सचा समावेश आहे. ते सातत्याने त्यांचे व्यावसायिक ज्ञान, नितीमत्ता आणि सर्वोत्तम ग्राहक तेवा देतात. एमडीआरटी पात्र असलेले जगात सर्वोत्तम वित्तीय प्रोफेशन्ल मानले जातात.
एमडीआरडी सदस्यता दोन विभागात असते - कोर्ट ऑफ द टेबल (सीओटी) आणि टॉप ऑफ द टेबल (टीओटी). कोर्ट ऑफ द टेबल सल्लागाराने एमडीआरटीच्या इतर सदस्यांच्या तुलनेत तीनपट अधिक व्यवसाय करणे आवश्यक असते. टॉप ऑफ द टेबल सल्लागारांनी कोर्ट ऑफ द टेबल सदस्यांच्या दुप्पट व्यवसाय करणे गरजेचे असते. टाटा एआयएकडे १०३ कोर्ट ऑफ द टेबल सल्लागार आहेत आणि ३० टॉप ऑफ द टेबल सल्लागार आहेत.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |