09:31pm | Sep 22, 2023 |
सातारा : राज्य शासन शिक्षणावर तब्बल सत्तर हजार कोटी रुपये खर्च करते. मात्र केवळ सुविधा देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होते असे नाही, तर अध्ययनाचा दर्जा सुद्धा सुधारायला हवा. विद्यार्थ्यांना व्यवहाराची संवेदना समजावून सांगणारे कौशल्याधिष्ठित ज्ञान मिळायला हवे, अशी अपेक्षा शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी व्यक्त केली.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर समाधी परिसरात आयोजित 163 व्या कर्मवीर जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मांढरे पुढे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये समाज साखळी मधील कमजोर गट शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. समाज आणि त्याची विचाररचना मजबूत व्हावी यासाठी शिक्षणाचा पाया विस्तारित करण्याचे काम रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र शिक्षणावर भरपूर खर्च केला म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त झाले, असे होत नाही. शैक्षणिक फी आकारणे उंच इमारती बांधणे, चांगले फर्निचर निर्माण करणे म्हणजे शिक्षणावर खर्च झाला असे म्हणता येणार नाही. त्यासाठी वर्गातील अध्ययन अनुभव किती दर्जेदार आहेत हे पाहावे लागेल. केवळ क्रीडांगणे उभी करून ऑलम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होत नाहीत. त्यासाठी कठोर मेहनत आणि तंत्रज्ञानाची जोड त्याला द्यावी लागते. थोडक्यात साचेबद्ध विचार आपणास सोडावे लागतील. शासनाचे दरवर्षी 70 हजार कोटी शिक्षणावर खर्च होतात. ज्ञान हवे असे हवे की, त्याला व्यवहारांमधील संवेदना समजल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण म्हणजे 360 अंशातून विकास व्हायला हवा. माणूस घडवते ते खरे शिक्षण. आजही राज्यांमध्ये एक कोटी निरक्षर आहेत, हे आजचे वास्तव आहे. अण्णांची रयत शिक्षण संस्था कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून एक रचनात्मक समाजाची निर्मिती करत आहे. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाला श्रमाची जोड दिली आणि श्रमप्रतिष्ठा त्याला मिळून दिली. भारतामध्ये अजूनही श्रेणीबद्धता बाहेरच्या क्षेत्रामध्ये दिसते. दुर्दैवाने भारतामध्ये तांत्रिक दृष्ट्या उच्च शिक्षण घेतलेला विद्यार्थी पदवी समारंभात जबाबदारी स्वीकारू शकत नाही, हे आजचे दाहक वास्तव आहे, असे मांढरे म्हणाले.
अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी सुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार संस्थेचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी मांनले.
यावेळी सहसचिव बी एन पवार, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, डाएटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, शिक्षण अधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सुभाष शिंदे, संस्थेच्या कायदा सल्लागार समितीचे सदस्य दिलावर मुल्ला, जनरल बॉडीचे सदस्य लाईफ मेंबर इत्यादी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर सविता मेनकुदळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संभाजी पाटील यांनी स्वागत गीत सादर केले. कर्मवीर अण्णांच्या 163 व्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी कार्यक्रमापूर्वी कर्मवीर समाधी परिसरातील समाधी स्थळावर जाऊन कर्मवीरांच्या स्मृतीस पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. तत्पूर्वी सातारा शहरातून कर्मवीर अण्णांनी वापरलेल्या शेवरोले गाडीला फुलांनी सजवून ती गाडी राजपथावरून चालवण्यात आली. त्या मागोमाग विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |