सातारा : सातारा जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक चळवळीतील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या गुंफण अकादमीच्या सहभागातून बिहारची राजधानी पटना येथे मंगळवारी (दि. २१) बहुभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुंफण अकादमी (महाराष्ट्र), साहित्यलेणी प्रतिष्ठान (गोवा) व बिहार हिंदी साहित्य संमेलन (पटना) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वाश्रमीच्या पाटलीपुत्र तर आजच्या पटना शहरातील हिंदी भवनमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता हे संमेलन आयोजित केले आहे.
बिहार हिंदी साहित्य संमेलनचे अध्यक्ष अनिल सुलख, डॉ. प्रेमचंद पांडे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ व पटना विद्यापीठातील प्रा. डॉ. नागेंद्रनाथ मेहता, गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, गोव्यातून कवी प्रकाश क्षीरसागर, चित्रा क्षीरसागर, दीपा मिरिंगकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, रजनी रायकर यांच्यासह बिहारमधील अनेक मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.
गुंफण अकादमीच्या वतीने गेली पंचवीस वर्षे महाराष्ट्रासह गोवा व सीमा भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी साहित्य संमेलनांसह विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातात. आता बिहारमध्येही बहुभाषिक कवी संमेलनाच्या आयोजनात सहभागी होत अकादमीने साहित्य क्षेत्रात सातारचा नावलौकिक वाढवला आहे. याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अकादमीचे कौतुक केले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |