04:40pm | Nov 17, 2023 |
नवी दिल्ली : ‘इस्रो’ आणि ‘नासा’ या अनुक्रमे भारतीय व अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘निसार’ (नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार) या संयुक्त मोहिमेचे पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत प्रक्षेपण अपेक्षित आहे, अशी माहिती नासाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कंपनाशी संबंधित काही चाचण्या केल्यानंतर निसार अवकाशात झेपेल, असेही त्यांनी सांगितले. या तीन वर्षांच्या अंतराळ मोहिमेत ‘निसार’ उपग्रहाद्वारे दर १२ दिवसांनी पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित पृष्ठभागाचे सर्वेक्षण केले जाईल. केवळ १२ दिवसांत पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची ‘निसार’ची क्षमता आहे.
नासा-निसार या प्रकल्पाचे व्यवस्थापक फिल बरेला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की पुढील वर्षीच्या पहिल्या तिमाहीत निसारचे प्रक्षेपण करण्याचे इस्रोचे नियोजन आहे. निसार त्यादृष्टीने तयार आहे. मात्र, जानेवारी २०२४ पूर्वी निसारचे प्रक्षेपण होण्याची अपेक्षा नाही. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान मार्क -२ च्या माध्यमातून निसार अवकाशात झेपावेल. या मोहिमेचा कालावधी तीन वर्षे असून दर १२ दिवसांनी पृथ्वीवरील जमीन आणि बर्फाच्छादित पृष्ठभागाच्या सर्वेक्षणाचा उद्देश आहे.
उपग्रह सुरू होण्याच्या ९० दिवसांच्या कालावधीनंतर या सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. सध्या या मोहिमेशी संबंधित कंपन चाचणी सुरू असून कार्यक्षमतेशी निगडित अनेक चाचण्या करण्याची गरज आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘नासा’च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचया संचालक डॉ. लॉरी लेशिन म्हणाल्या, की निसार प्रकल्प यापूर्वीच्या कोणत्याही प्रकल्पांपेक्षा अधिक चांगला आहे. मागील मोहिमांचा डेटासेट आधारभूत ठरू शकतो. त्यामुळे, निसारसाठी नव्या प्रकारची क्षमता आपल्याला उपलब्ध असेल. त्यामुळे, या मोहिमेतून आधाररेखा मिळविण्यासाठी मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवू. अनेक वर्षांच्या कालक्रमानुसार पृथ्वीमधील बदल टिपणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीनेच आमचे प्रयत्न आहेत.
काय आहे 'निसार'?
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, निसार ही पृथ्वीच्या खालील कक्षेतून भ्रमण करणारी वेधशाळा असून ती इस्रो व नासाने संयुक्तपणे विकसित केली आहे. केवळ १२ दिवसांत निसार पृथ्वीचा नकाशा तयार करू शकते. पृथ्वीच्या परिसंस्थेतील बदल, बर्फाचे वस्तुमान, समुद्र पातळीतील वाढ, भूकंप, ज्वालामुखी, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती आदी समजून घेण्यासाठी निसारकडून स्थानिक व तात्पुरत्या स्वरूपात सातत्याने डेटा उपलब्ध होईल.
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |