जगभरात वृद्धांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. केवळ खर्चच नाही, तर वृद्धांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी काम करणार्या हेल्थवर्कर्सचा तुटवडा जाणवू लागला आहे. या परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या जगण्याचा दर्जा सुधारून त्यांना स्वावलंबी आयुष्य जगता यावे, याची गरज निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यपूर्ण दीर्घायुषी जीवनासाठीच्या आहारामध्ये आणि तरुणांच्या आहारात मूलभूत फरक नाही. परंतु, जसजसे वय वाढते, त्यानुसार आहारातून मिळणार्या उष्मांकाची गरज कमी होत जाते. उष्मांकाची दैनंदिन गरज वय वर्षे 40 ते 50 यामध्ये 5 टक्क्यांनी कमी होते. 50 ते 60 या वर्षांच्या काळात दैनंदिन गरज 7 टक्क्यांनी कमी होते आणि 60 वर्षांच्यापुढे 10 टक्क्यांनी कमी हाते. म्हणजेच वयानुसार उष्मांकाची गरज भागविणारा; परंतु समतोल आहार आवश्यक असतो. समतोल आहाराची गरज भागवताना ज्येष्ठांच्या काही शारीरिक अवस्थांचा, समस्येचा विचार करावा लागतो.
ज्येष्ठांमध्ये वयानुसार काही शारीरिक बदल होत असतात, त्यामुळे भुकेचे प्रमाण कमी होते. शरीरात चालणार्या चयापचयाचा वेग कमी होतो. लवकर पोट भरते आणि गंध आणि चव यांचे प्रमाण कमी होते. नंतरच्या काळामध्ये जास्त गोड आणि जास्त खारट खाण्याकडे कल होतो. दाताचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे. दात खिळखिळे झालेले असल्यास पदार्थ चावण्याची क्रिया पूर्ण होत नाही. त्यासाठी दातांच्या डॉक्टरांना दाखवणे आणि जरूर पडल्यास कवळी बसवणे महत्त्वाचे. पदार्थ गिळण्यास त्रास होऊ शकतो. त्यासाठी पदार्थ मऊ बनविणे आणि योग्य प्रमाणात पाणी घेणे जरुरीचे असते. पनचनसंस्थेची कार्यक्षमता कमी होणे, जड खाणे किंवा जास्त स्निग्धांश असलेला आहार, जास्त प्रमाणातील जेवण, कमी चोथा असलेले पदार्थ, मद्यपान अशा पद्धतीच्या आहारामुळे अपचन होऊन वाताचे प्रमाण वाढते. जेवण झाल्यावर लगेचच झोपण्याची सवय, जास्त गोड आणि मसालेदार खाण्याने पित्ताचे प्रमाण वाढते. कमी प्रमाणात पातळ पदार्थ आणि पाणी तसेच चघळचोथ्याच्या आहारामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे भुकेचे प्रमाण कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून कुपोषण होते.
स्वास्थ्याच्या द़ृष्टीने मानसिक अवस्था अतिशय महत्त्वाची असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा, उदासिनता याचा सामना करावा लागतो. शारीरिक ताकद कमी असल्यास हालचालींवर बंधन येतात. द़ृष्टी कमी होते या सगळ्याचा परिणाम आहारावर होऊन शारीरिक गरजेपेक्षा कमी आहार घेतला जातो. ज्येष्ठ नागरिकांना अनेक वेळा काही आजारांची सोबत असते. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांचा सामना करताना काही वेळा त्यांचा बराचसा वेळ दवाखान्यात जातो किंवा कुटुंबातील इतरांच्या वेळापत्रकाशी जमवून घेताना आहाराच्या वेळा आणि प्रमाण पाहणे अवघड जाते. या सर्वांचा परिणाम भुकेचे प्रमाण कमी होणे, पचनसंस्थेचे त्रास जास्त होतो. अर्थातच यासर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी योग्य आहार घेणे आवश्यक आहे.
यासाठी आहारातील जास्तीत जास्त भाग हा वनस्पतीजन्य पदार्थापासूनच असावा. त्यामध्ये अॅन्टी ऑक्सिडंटस्, जीवनसत्वे, खनिजे, चघळचोथ्याचे प्रमाण जास्त असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण शून्य असते. अगदी कमी प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धांश असतो. या पद्धतीचा आहारा हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब कॅन्सर, पक्षाघात याला प्रतिबंध करतो. स्मरणशक्ती चांगली राहण्यास मदत होते. खोबरेल तेल आणि पामतेल हे वनस्पतीजन्य असूनही जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड स्निग्धांश असलेले आहेत त्यांचा वापर कमी असावा. तळलेले पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात. त्यामुळे ट्रान्स फॅटी अॅसिड्स तयार होऊन रक्तवाहिन्यांमधील पेशींवर हल्ला चढवून अपाय करतात. ज्येष्ठ नागरिकांनी असे पदार्थ टाळावे. पॉलिश केलेले तांदूळ, मैद्याचे पदार्थ यामुळे मधुमेह, हृदयविकार, स्थूलता यांचे प्रमाण वाढते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते म्हणून, असे पदार्थ वर्ज्य करावेत. कार्यक्षम आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मर्यादित उष्माकांचा आहार घ्यावा. मर्यादित म्हणजेच गरजे इतकाच. आपल्या स्वत:च्या शारीरिक गरजेइतकाच आणि शारीरिक आजारानुसार उष्माकांची गरज किती आहे हे ज्येष्ठ नागरिकांनी समजावून घेऊन जीभेवर ताबा मिळवावा. आहारातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण मर्यादेत ठेवावे. परंतु, स्वयंपाक करताना पदार्थासाठी (फोडणी म्हणून) लागणारे तेल वापरण्यास हरकत नसते. परंतु, शेंगदाणे, खोबरे, तीळ, काजू, बदाम यांसारख्या पदार्थाचा वापर कमी ठेवावा, कारण त्यामध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. अशा प्रकारे काळजी घेतल्यास उतारवयातही निकोप जीवनाचा आनंद लुटता येईल.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |