सातारा : पश्चिम महाराष्ट्रात ऊस दरासाठी शेतकर्यांच्या आंदोलनाने आता उग्र स्वरूप धारण केले असून सहकारी आणि खाजगी साखर कारखानदारांची मुजोरी रोखण्यासाठी बळीराजा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संघटनेने गतवर्षी तुटून गेलेल्या ऊसाला प्रति टन 400 रुपये मिळावेत व चालू हंगामातील तुटून जाणाऱ्या उसाला एक रकमी 3500 रुपये मिळावेत, या मागणीसाठी आंदोलन करत सुमारे 60 ते 70 ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. बळीराजा आणि स्वाभिमानी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत. जोपर्यंत ऊस दर मिळत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करू नका, अन्यथा वाहनाच्या चाकातील हवा सोडली जाईल, असा कडक इशारा या संघटनांकडून ऊस वाहतूकदारांना देण्यात आला आहे.
ऊस दरासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. केंद्र, राज्य सरकार, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व साखर कारखानदार एकाही शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता कामकाज करीत असून कारखानदारांनी गळीत हंगाम मोठ्या जोमाने सुरू केला आहे. ऊस दराबाबतचा शेतकर्यांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही, अशी भूमिका बळीराजा शेतकरी संघटनेने घेतली आहे.
सातारा जिल्ह्यात ही संघटना आक्रमक झाली असून सातारा व सांगली रस्त्यावर उसाने भरलेले ट्रॅक्टर रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास अडविण्यात आले. ऊस दर आंदोलन सुरू असताना वाहतूक का करता ? असा सवाल करत त्यांनी सुमारे 60 ते 70 वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. यापुढे अशाच पद्धतीने आंदोलन सुरू राहील, असा इशारा संघटनांनी दिला आहे. कराड -कासेगाव परिसर, पाटण -कराड रस्ता, मलकापूर, तासवडे टोल नाका, मल्हारपेठ, निसरे फाटा, तांबवे फाटा, पाटण रस्ता- वारूंजी फाटा परिसरात आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले असून रविवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सातार्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातही हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांची भंबेरी उडाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानुषंगाने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून साखर कारखाना प्रशासन ऊस दराबाबत काय भूमिका घेणार, याकडे बळीराजा आणि स्वाभिमानी संघटना तसेच शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |