01:40pm | Nov 17, 2023 |
मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केलंय. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी खास पोस्ट करून बाळासाहेबांविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. आदित्य ठाकरेंची खास पोस्ट ! आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात 'स्पेशल' असतं... त्यात आदर असतोच, पण मैत्री जास्त असते... धाक असतोच, पण प्रेम जास्त असतं... वयाचं अंतर असतंच, पण मन जवळ असतं.... आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो... त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही! मी भाग्यवान आहे की, जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे... बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, अशी खास पोस्ट आदित्य ठाकरेंनी लिहिली आहे. शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रम : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्तानं आज शिवाजी पार्कवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी दादर शिवाजी पार्क स्मृतीस्थळ सज्ज झालंय. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादनासाठी येणार आहेत. यामुळे शिवाजी पार्कवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवतीर्थावर शिवसैनिक भिडले : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज, शुक्रवारी असताना, शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते; तसेच उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार संघर्ष उफाळून आला होता. शाब्दिक चकमकी, धक्काबुक्की असे प्रकार घडले. पोलिसांनी मोठ्या कष्टाने परिस्थिती आटोक्यात आणली. जोरदार घोषणाबाजी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमानंतर दादरच्या शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी गेले. मुख्यमंत्र्यांनी या वेळी बाळासाहेबांना अभिवादन केले. ही माहिती मिळताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्कात आले. त्या वेळी दोन्ही गटांत आधी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. याच वेळी आमदार अनिल परब, खासदार अनिल देसाई आणि महेश पेडणेकरही स्मृतिस्थळावर आले. या वेळी ‘गद्दारांना हाकलून द्या,’… अशा घोषणा देण्यात आल्या; तर शिंदे गटाकडून ‘एकनाथ शिंदे अंगार है, बाकी सब भंगार है,’ अशा घोषणा देण्यात आल्या.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |