09:35pm | Sep 22, 2023 |
सातारा : भाद्रपद शुक्ल सप्तमीच्या निमित्ताने ज्येष्ठा गौरीचे स्वागत झाल्यानंतर शुक्रवारी पिठाच्या सोळा दिव्यांद्वारे महालक्ष्मीची आरती आणि नैवेद्यासाठी 56 प्रकारचे भोग तयार करण्यामध्ये गृहिणींची धांदल उडाली. साताऱ्यात गौरी आवाहनानंतर त्यांचे विधिवत पूजन व नैवैद्य सोहळा घरोघरी थाटामाटात पार पडला.
शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी घरोघरी गौरीचे आगमन होते. याला आपण ज्येष्ठा गौरी आवाहन म्हणतात. तीन दिवस असलेल्या गौरी पूजनाला विशेष महत्त्व आहे. गौरी आवाहनाच्या दिवशी महालक्ष्मीचे आगमन होते. महालक्ष्मीचा साजशृंगार करून त्यांची स्थापना केली जाते. महालक्ष्मीला अंबाडीची, शेपूची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचे नैवेद्य दाखवला जातो.
सप्तमीच्या दिवशी महालक्ष्मीच्या 16 दिव्यांद्वारे आरतीला आणि 56 भोग तयार करण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व असते. गौरी पूजनाच्या वेळी महालक्ष्मी साठी पंचपक्वान्न केले जाते. महालक्ष्मीला पाहण्यासाठी घरी पाहुणे, आप्तस्वकीय येतात. याच दिवशी महिला हळदी-कुंकवासाठी एकमेकींच्या घरी जातात. हळदीकुंकवाच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून आली. महालक्ष्मीचे म्हणजेच गौरीचे कोडकौतुक 56 भोगाद्वारे केले गेले. यामध्ये मोदक, पुरणपोळी, अळूची भाजी, उडीद मुगाचे वडे, कोशिंबीर, चटण्या, खीर, भजी, कढी, आंबील, पंचामृत 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी, कटाची आमटी, लोणचे, लाडू, करंज्या, भात-वरण अशा विविध पदार्थांचा महानैवेद्य दाखवला गेला. हे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवून महालक्ष्मी पूजा करण्यात आली आणि नंतर नैवेद्य दाखवला गेला.
काही ठिकाणी सुहासिनी संध्याकाळी महालक्ष्मीच्या आरती नंतर सर्व दारेखिडक्या बंद करण्याची प्रथा आहे. कारण महालक्ष्मीना त्यावेळी जेवायला वेळ दिला जातो. तोवर घरातील सर्व मंडळी बाहेर असतात. अशा बऱ्याच अख्यायिका महालक्ष्मी पूजनाच्या सांगितल्या जातात.
मात्र गौराईच्या कोडकौतुकाच्या निमित्ताने फळबाजार आणि मिठाई बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली. शनिवारी गौरी विसर्जन होत आहे. विसर्जनाच्या दिवशी भाजी-पोळी, दहीभात आणि कानोल्याचा म्हणजे करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. विसर्जनाच्या वेळी महालक्ष्मीला काही खायचे पदार्थ शिदोरी म्हणून देतात. महालक्ष्मीची आरती करून पुढील वर्षी येण्याची तिला निमंत्रण दिले जाते आणि निरोप दिला जातो. शनिवारी गौराईंचे विसर्जन होत असून त्याची तयारी वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळे आणि घरगुती स्वरूपामध्ये केली जात आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |