11:53am | Nov 20, 2023 |
सातारा : केंद्र शासन पुरस्कृत विकास सेवा सोसायट्यांचे राष्ट्रीय पातळीवरील संगणकीकरणाचा महत्वकांक्षी प्रकल्प सध्या राज्यात सुरु आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाचे सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा, वाई, जावली व कराड तालुक्यामध्ये नियुक्त क्लस्टर्स मार्फत वेगाने कामकाज सुरू आहे. सदरचे कामकाज निर्धारीत मुदतीत पूर्ण करणेचे उद्दिष्ट आहे. देशातील ९५००० विकास सोसायट्यापैकी ६३००० विकास संस्थांचे संगणकीकरण करणेत येणार असून राज्यातील जवळपास २१००० विकास संस्थांपैकी १२००० विकास संस्थांचे संगणकीकरण निश्चित झाले आहे. सदरचे कामकाज तीन टप्यात होणार असून प्रथम टप्यात राज्यातील एकूण ४००० संस्थांचे संगणकीकरण करणेत येणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ९६० विकास सोसायट्यापैकी ९३३ विकास संस्थांची निवड प्रथम टप्यात करणेत आली असून २१४ विकास संस्थांचे संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणेचे उद्दिष्ट आहे. सातारा जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम असून सर्व संस्थांचे माहे मार्च २०२२ अखेरचे ऑडीट पूर्ण झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील जवळपास ९७ टक्के संस्थांचे संगणकीकरण प्रथम टप्यात घेणेचे निश्चित झाले असून हा बहुमान एकमेव सातारा जिल्हा बँकेला व संलग्न सोसायट्याना मिळाला आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाची पहाणी व मार्गदर्शन करणेसाठी मा. अनिल कवडे, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व मा. श्रीमती रश्मी दराड, प्र. मुख्य सरव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक कार्यालय, पुणे, मा. श्री. सुधाकर रघुवंत, सहाय्यक महाव्यवस्थापक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक प्रादेशिक कार्यालय, पुणे, मा. मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा, या उपस्थित मान्यवरांचा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे यांचेमार्फत यथोचित सत्कार करणेत आला.
याप्रसंगी मा. अनिल कवडे म्हणाले, कृषि व ग्रामीण अर्थ व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सातारा जिल्हा बँक सदैव जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या पाठीशी आहे. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आदर्शवत कामकाज हे इतर सहकारी बँकांना मार्गदर्शक ठरत असेलेचे आणि सहकारी बँकिंग क्षेत्रात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशभरात नावलौकिक असलेचे गौरवोद्गार अनिल कवडे यांनी बँकेस दिलेल्या भेटीप्रसंगी काढले. सोसायटी संगणकीकरनाचे काम वेळेत पूर्ण केलेमुळे संस्था कामकाजात पारदर्शकता येणार आहे, याचा फायदा संस्थेतील सभासदानाही होणार असलेचे यावेळी त्यांनी सांगितले.
मा. श्रीमती रश्मी दराड म्हणाल्या, सातारा जिल्हा बँक आर्थिकदृष्टया सक्षम आहे. बँकेने शैक्षणिक कर्ज, अॅग्रो टूरिझम, महिला बचतगट, फार्मर्स क्लब, गृहकर्ज, वाहन कर्ज, शुगर फॅक्टरी इ. योजनांच्या माध्यमातून चांगले कामकाज केलेले आहे. बँक शासनाच्या अनुदान योजनाही चांगल्या प्रकारे राबवित आहे. बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन, प्रशासन अत्यंत अभ्यासू असून योजनांची प्रभावीपणे अंमबजावणी केली जाते म्हणूनच नाबार्ड कोणत्याही नवीन योजनांची सुरुवात करावयाची असल्यास सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून करत आहे. सर्व सोसायटी संगणकीकरण कामकाज अनुषंगाने केलेल्या नियोजनानुसार सोसायट्यांचे DCT कामकाज पूर्ण झालेनंतर त्यांचे Pre Migration देखील पूर्ण होईल व सर्व संस्था Go-live वर जातील. मार्च २०२४ पासून नवीन सोसायटी संगणकीकरण मधूनच सर्व संस्थांचे कामकाज सुरु होईल असे श्रीमती रश्मी दराड म्हणाल्या.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या गेल्या सात दशकाची यशस्वी वाटचाल विषद केली. यामध्ये विशेष करून बँकेची वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, जिल्हा बँकेची ०% NPA ची परंपरा, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुक सेवा यामुळे बँकेस आय.एस.ओ. ९००१-२०१५ मिळालेले नामांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी यामुळे देशाचा नावलौकिक देशपातळीवर झालेला असलेचे सांगितले. नाबार्डचे बँकेला नेहमीच चांगले सहकार्य असून तपासणीमध्ये टॉप रेटींग मिळालेबद्दल नाबार्डचे आभार मानले. बँकेचे एकूण कामकाज चांगले असलेमुळे नाबार्ड व त्याच बरोबर इतर विविध संस्थांचे १०० पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झालेले असून बँक देशात अग्रगण्य आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतील विकास संस्थांच्या विचार केला तर सातारा जिल्ह्यातील विकास संस्थांचे कामकाज चांगले असून ९५४ पैकी ९४० विकास संस्था नफ्यात आहेत.
राजेंद्र भिलारे यांनी बँकेचे कामकाज अनुषंगाने असणा-या अडचणी सहकार कार्यालय व नाबार्डकडून सोडविल्या जातील व त्यांचेकडून बँकेला नेहमीच चांगले सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आहे असे सांगितले.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |