नवी दिल्ली : महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना सरकार लवकरच मोठा दिलासा देण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोदी सरकार स्वस्त एलपीजी सिलिंडरची भेट देऊ शकते. स्वयंपाकाच्या गॅसची किंमत सुमारे २०० रुपयांनी कमी होऊ शकतात, असा मीडिया अहवालात सूत्रांच्या हवाल्याने हा दावा करण्यात आला आहे. देशात १४.२ किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात अखेरचा बदल १ मार्च २०२३ रोजी करण्यात आला होता, तर त्याआधी जुलै २०२२ मध्ये एलपीजीच्या किमतीत बदल करण्यात आला होता. असे केल्यास मध्यमवर्गीयांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल कारण गेल्या काही महिन्यांपासून जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्याने सर्वसामान्य विशेषतः गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. पेट्रोलियम कंपन्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित करतात. देशभरात घरगुती गॅसची किंमत सध्या राजधानी दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १,१०३ रुपये आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत १४ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत १०५२.५० रुपये, चेन्नईत १०६८.५० रुपये आणि कोलकात्यात १०७९ रुपये आहे. दुसरीकडे, १ ऑगस्ट रोजी १९.२ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होऊन त्याची किंमत १०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. तर तेल विपणन कंपन्यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला प्रति सिलिंडर ५० रुपयांची वाढ केली असताना मे महिन्यात कंपन्यांनी दोनदा किंमतीत वाढ नोंदवली गेली होती. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकार ही पावले उचलणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू असल्याने सरकारकडून पाऊल उचलले जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |