10:36pm | Nov 20, 2023 |
सातारा : कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी, परतवडी, कोलवडी येथील पुणे मिरज रेल्वे लाईनमध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यास २९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी शेतकऱ्यांच्यावतीने दिला.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी, परतवडी, कोलवडी या तीन्ही गावातल्या शेतकऱ्यांची शेती गेली आहे. कोरेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयाने जे नकाशे केले आहेत. त्या नकाशामध्ये शेतकऱ्यांची जमिन गेली आहे पण त्याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. गेली सहा महिने हे शासनाकडे हेलपाटे घालत आहेत पण त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही. रेल्वे लाईनचे काम सुरु असताना शेतकऱ्यांनी त्याकडे विकासाचे काम म्हणून पाहिले पण शासनाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
शेतकऱ्यांचा मोबदला शासनाकडून मिळण्यासाठी शेतकरी हेलपाटे घालत आहेत. पण आजपर्यंत त्यांना शासकीय अधिकाऱ्यांनी उडवाउडवीचीच उत्तरे दिली आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वास्तव न सांगता नेहमी त्याची थट्टाच केली आहे. त्यामुळे न्याय न मिळाल्यास २९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसणार आहे. कोरेगाव तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांनीही आपल्यावर अन्याय झाला असल्यास या ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन रमेश उबाळे यांनी केले.
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |