06:45pm | Feb 04, 2023 |
सातारा : पतीचे असलेले विवाहबाह्य संबंध आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमातून पोलिसी सेवेत असलेल्या पत्नीने पतीच्या हत्येची सुपारी सराईत गुन्हेगारांना दिली. खुनाच्या या गुन्ह्यातील संशयितांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. संशयितांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना 10 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अभिषेक विलास चतुर वय 27 राहणार नांदगिरी तालुका कोरेगाव, शुभम हिंदुराव चतुर वय 27 राहणार कोरेगाव सध्या पुणे, राजू भीमराव पवार वय 26 राहणार पंताचा गोट सातारा, सचिन रमेश चव्हाण राहणार मुळशी पुणे, सुरज ज्ञानेश्वर कदम वय 27 राहणार खेड तालुका सातारा सध्या पुणे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाढे, तालुका सातारा गावच्या हद्दीत पुणे-कोल्हापूर महामार्गावरील सर्व्हिस रोड लगत अमित आबासाहेब भोसले राहणार शुक्रवार पेठ, सातारा यांच्यावर अज्ञातांनी मोटरसायकलवर येऊन गोळीबार करून तसेच खुनी हल्ला करून त्यांचा खून केला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या. अरुण देवकर यांनी त्यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे व पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी त्यांच्याकडील तपास पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेतील तपास पथकाने घटनास्थळावर चौकशी केली. तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध घेऊन मृताच्या कुटुंबाकडे व इतर साक्षीदारांकडे चौकशी करून सहा आरोपी निष्पन्न केले. त्यामधील एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
या आरोपींच्या ठावठिकाण्याबाबत माहिती घेतली असता ते गुन्हा घडल्यापासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून त्यांचा सातारा, पुणे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, लातूर, अलिबाग, इंदापूर, उज्जैन- मध्य प्रदेश अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच गोवा राज्यात शोध घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांची दोन स्वतंत्र पथके गुन्हेगारांच्या मागावरच होती. दरम्यान गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी बातमीदार तयार करून त्यांना पकडण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न करण्यात आले. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित आरोपी हे गोवा येथे असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. संबंधित आरोपी हे सराईत असल्याने व ते त्यांचे लोकेशन सातत्याने चेंज करत असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व तपास पथक गोवा येथे पोहोचण्यास दोन तीन तासाचा अवधी होत असल्याने तातडीने हालचाल करण्यासाठी सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ही माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांना देऊन या आरोपींना ताब्यात घेतले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या संशयितांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी अमित याच्या पत्नीकडून सुपारी घेऊन हा खून केल्याचे सांगितले. त्यानंतर आमित याची पत्नी तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन आमित याच्या पत्नीकडे विचारपूस केली असता तिने तिचा पती हा बाहेरील स्त्रियांशी अनैतिक संबंध ठेवून तिला मारहाण करीत होता. म्हणून तिनेच त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, रमेश गर्जे, उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, संतोष पवार, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, निलेश काटकर, गणेश कापरे, मोहन पवार, मयूर देशमुख, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाने, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, अनिकेत जाधव, सुशांत कदम व सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलिस अंमलदार राजेंद्र वंजारी, दादा परिहार, नीतीराज थोरात, सतीश पवार, सचिन पिसाळ, रायसिंग घोरपडे, राहुल राऊत यांनी केली आहे.
या गुन्ह्याच्या घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना गोपनीय बातमीदार सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणात्मक बाबींच्या आधारे आरोपीची माहिती काढून तसेच त्यांचा सलग दहा दिवस पाठलाग करून त्यांना जेरबंद करण्याची कौशल्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख आणि बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |