बंगळुरु: चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आदित्य-एल1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ चं लाँचिंग झालं आहे. यासोबतच भारताने एक नवा इतिहास रचला आहे. आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून आदित्य एल-१ ला प्रक्षेपित केलं. लाँचिंगच्या १२७ दिवसांनंतर आदित्य एल-१ L1 पॉईंटपर्यंत पोहोचेल. त्यानंतर तो सूर्याचा अभ्यास करेल आणि सूर्याबाबत महत्त्वाची माहिती पाठवण्यास सुरुवात करेल. आदित्य-एल1 ला सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेटने अवकाशात सोडण्यात आलं आहे. XL प्रकारची ही २५ वे उड्डाण आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅड २ वरून हे प्रक्षेपण झालं. हे रॉकेट १४५.६२ फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचे वजन ३२१ टन होते. चार टप्प्यात हे रॉकेट आदित्य-एल१ ला अवकाशात सोडणार आहे. पीएसएलव्ही-एक्सएल रॉकेट आदित्यला त्याच्या नियुक्त कक्षेत सोडेल. प्रक्षेपणानंतर सुमारे एक तासाने आदित्य-एल१ त्यांच्या नियुक्त कक्षेत पोहोचेल. आदित्य-एल१ चे वजन १४८०.७ किलो आहे. प्रक्षेपणानंतर सुमारे ६३ मिनिटांनी आदित्य-एल१ अंतराळयान रॉकेटपासून वेगळे होईल. या रॉकेटच्या सर्वात लांब उड्डाणांपैकी हे एक आहे. आदित्य’चा प्रवास कसा होणार? - चांद्रयानाप्रमाणेच आदित्य यानही सुरुवातीला पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करेल. - त्यानंतर या यानाच्या परिभ्रमण कक्षा अधिकाधिक लंबवर्तुळाकार केल्या जातील. - यानातील प्रणोदकाच्या साह्याने (प्रॉपल्शन मॉड्यूल) ते एल वन पॉइंटच्या दिशेने प्रक्षेपित केले जाईल. - या टप्प्यात यान पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून पलीकडे जाईल. L1 म्हणजे Lagrange Point One म्हणजे काय जिथे आदित्य-एल१ जाणार आहे? आपल्या ताऱ्याला म्हणजेच सूर्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. तर, पृथ्वीचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आहे. अंतराळात जिथे या दोघांचे गुरुत्वाकर्षण एकमेकांना भिडते किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जिथे संपतो आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव सुरू होतो. या मधल्या बिंदूला Lagrange Point म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे पाच लॅरेंज बिंदू चिन्हांकित केले गेले आहेत. भारताचे सूर्ययान लॅरेंज पॉइंट १ म्हणजेच L1 येथे तैनात असेल. दोन्हीच्या गुरुत्वाकर्षणाची जी सीमा आहे, तिथे एखादी छोटी वस्तू जास्त काळ राहू शकते. ती दोघांच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेली असेल. त्यामुळे अवकाशयानाचे इंधन कमी वापरले जाते. तो बराच वेळ काम करु शकतो. L1 हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील सरळ रेषेच्या डावीकडे स्थित आहे. हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे. म्हणजे १५ लाख किमी. तर सूर्यापासून पृथ्वीचे अंतर १५० दशलक्ष किलोमीटर आहे. एकूण पाच लॅरेंज पॉइंट्स आहेत - L1, L2, L3, L4 आणि L5.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |