10:50pm | Nov 20, 2023 |
सातारा : पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी बेकायदेशीर शस्त्र (गावठी पिस्टल/कट्टा) बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्रांबाबत कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत आज मॉर्निंग स्कॉड पेट्रोलींग दरम्यान एका इसमास त्यांच्या हालचाली संशयास्पद जाणवल्याने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तुल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळुन आली आहेत. शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत मॉर्निंग स्कॉड करीता शिरवळ पोलीस ठाणेचे पोहवा. अंकुश गार्डी यांना नेमणेत आलेले होते. मार्निंग स्कॉड दरम्यान त्यांना पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडलगत असले महापारेषण कंपनी समोर सर्व्हिस रोडलगत एक इसम त्याच्याकडील मोटार सायकलसह मिळुन आला होता. त्याच्याकडे प्रथमदर्शनी विचारपुस केली असता त्याच्या हालचाली व हावभाव संशयीत जाणवल्याने पोहवा गार्डी यांनी याबाबत पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांना कल्पना दिली. शिरवळ पोलीस ठाणेकड़ील पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार व पोलीस पथकाने सदर इसमाची अधिक विचारपुस करुन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एकुण सात जिवंत काडतुसे मिळून आली. सदर इसमाने सदरचे पिस्टल व जीवंत काडत्से हि बेकायदा आपले कब्जात बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुध्द शिरवळ पोलीस ठाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
माहे नोव्हेबर २०२२ पासून सातारा जिल्द्यात आतापर्यंत एकृण ६५ देशी बनावटीचे पिस्टल / कड्े त्याचप्रमाणे १७५ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळया असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यापुढेही अशा कारवाया अधिक तीव्रतेने केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी दिली आहे.
ही कारवाई शिरवळ पोलीस ठाणे कड़ील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहा. पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलीस अंमलदार अंकुश गार्डी, जितेंद्र शिंदे, सचिन वीर, सुनिल मोहरे, प्रशांत धुमाळ, अरविंद बाऱ्हाळे, भाऊसाहेब दिघे यांनी सहभाग घेऊन केली आहे. कारवाईमधील सहभागी सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी अभिनंदन केलेले आहे.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |