08:35pm | Sep 23, 2023 |
सातारा : भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे पार पडली,
या बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंदभाऊ देशपांडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमारभाऊ गोरे, प्रदेश चिटणीस भरत नाना पाटील, सातारा जिल्हा प्रभारी माजी खासदार अमर भाऊ साबळे, लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, लोकसभा संयोजक सुनील तात्या काटकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, मनोजदादा घोरपडे, माजी आमदार मदनदादा भोसले, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारी प्रियाताई शिंदे, प्रदेश कार्यकारी सदस्य सुवर्णाताई पाटील, वाई विधानसभा निवडणूक प्रमुख सुरभीताई भोसले, सातारा विधानसभा निवडणूक प्रमुख अविनाशदादा कदम, कराड दक्षिण निवडणूक प्रमुख धनंजय पाटील, फलटण विधानसभा प्रमुख जयकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात 'मेरी माटी मेरा देश' चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा आढावा या बैठकीत घेण्यात, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भा ज पा तर्फे सेवा पंधरावड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा आढावा सुद्धा या वेळी घेण्यात आला. बैठकीच्या वेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना धैर्यशीलदादा यांनी सांगितले, सातारा जिल्ह्यातील मंडल अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती सातारा जिल्हा प्रभारी, माजी खासदार अमरभाऊ साबळे यांनी घेतल्या आहेत. मी स्वतः सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा सर्व मंडल यामध्ये प्रवास करून पदाधिकाऱ्यांची चाचपणी केली आहे. जिल्हा कार्यकारिणी आणि मंडल अध्यक्ष तसेच आघाड्या मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील. त्यानंतर मंडल कार्यकारिणी, आघाड्या, मोर्चे यांची जिल्हा, मंडल कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल.
पक्षाची कामे प्रामाणिकपणे करणारे, पक्षाचे कामाला वेळ देणारे असे कार्यकर्ते-पदाधिकारी निवडीमध्ये घेतले जातील. जुन्या- नव्या कार्यकर्त्यांचा समतोल पदाधिकारी निवडी मध्ये राखण्याचा प्रयत्न केला जाईल. जेष्ठ कार्यकर्ते, महिला, युवती, युवक यांच्या बाबतीत योग्य समन्वयं साधणारे पदाधिकारी घेण्याबाबत विशेष काळजी घेतली जाईल. नवीन कार्यकारिणी चांगले काम करून भारतीय जनता पार्टीचा जनाधार सातारा जिल्ह्यात वाढवण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वासही धैर्यशीलदादा कदम यांनी व्यक्त केला.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |