06:15pm | Aug 13, 2022 |
लिंब : औषध निर्माण क्षेञात संशोधनात्मक मनुष्यबळाची गरज असून यासाठी गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयाने पुढाकार घ्यावा असे मत डायरेक्टर नाटोली सायंटिफिक अमेरिकेच्या फार्मास्युटिकल मटेरियल रिसर्च कंपनीत संशोधक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल हावरे यांनी मत व्यक्त केले. ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालय दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी ,उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव यांनी त्यांचा शाल बुके देऊन सत्कार केला. डॉ राहुल हावरे पुढे म्हणाले की भविष्यात उद्भवणारे विविध आजार व त्यावर प्रभावी उपचारपद्धती विषयी संपूर्ण जगात संशोधन केले जात आहे. वातावरणातील बदल व निर्माण होणारे धोकादायक विषाणूंचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे आरोग्य विषय गंभीर समस्या उभ्या राहत आहेत यावर मात करण्यासाठी औषधनिर्माण क्षेत्राचे ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संशोधक व्हावे.
संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की कोरोना महामारीच्या संकट काळात औषध निर्मितीचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याची जाणीव सर्वांना समजले आहे संशोधकाच्या अथंग परिश्रमातून निर्मिती झालेल्या औषधामुळे मानवी जीवन तरले आहे.
प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले की विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी आम्ही महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व प्रेरणा देत असतो विविध स्पर्धात्मक स्पर्धेत विद्यार्थी चमकदार कामगिरीही करतात अनेक विद्यार्थ्यां राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात्मक स्पर्धेत चमकले आहेत.
कोरोना महामारीच्या संकटकाळात केंद्र व राज्य सरकारने नियोजनबद्ध केलेल्या उपाययोजनाची संपूर्ण जगाने दखल घेऊन भारत सरकारला गौरविले आहे कठीण काळात सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देशाने या काळात दाखविलेले धैर्य साहस वृत्तीचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे भारतातील औषध निर्मिती कंपन्या व येथील संशोधकांनी या काळात घेतलेल्या परिश्रमाचे साथक झाले आहे जेथे प्रगत देश हतबल ठरले होते तेथे भारत देशाने यावर मात केली ही विशेष बाब आहे. प्रास्तविक व आभार उपप्राचार्य डॉ.योगेश गुरव यांनी केले
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |