सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासात्मक कामे लवकरच मार्गी लागतील, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले.
माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भामध्ये जे. पी. नड्डा यांची दिल्ली तेथे भेट घेतली. त्यावेळी नड्डा बोलत होते.
माढा लोकसभा मतदार संघातील प्रलंबित विकास कामांबाबत केंद्रीय स्तरावरून लवकरात लवकर प्रश्न सुटावेत यासाठी खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी नीरा- देवधर, भीमा स्थैरिकरण, फलटण - पंढरपूर रेल्वेच्या प्रश्नासंबंधी व येत्या बजेटमध्ये त्यावर निधी प्राप्त होण्यासंदर्भात, फलटण व पंढरपूर येथील विमानतळाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदारसंघांतील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी फलटण व म्हसवड येथील कॅरिडोर एमआयडीसी बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय स्तरावर विविध विभागाचे केंद्रीय मंत्री यांच्या बरोबर व्यापक बैठक लवकरच घेऊन हे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन अध्यक्ष जे पी नड्डा यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिले आहे.
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय संघटन महामंत्री बी एल संतोष यांचीही खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली व माढा मतदारसंघातील पक्ष संघटना व राजकीय विषयावर सखोल चर्चा केली. माढा, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील बुथ रचना, बूथ सशक्तिकरण अभियान, सेवा पंधरवडा, या विषयावर चर्चा करण्यात आली.
शिकारीसाठी लावलेल्या स्फोटकाने गायीचा मृत्यू |
१८ लाखांची रोकड असलेली बॅँग चोरी करणाऱ्या तीन युवकांना अटक |
ज्योतिर्मय महोत्सवाचे 8 रोजी होणार शानदार उद्घाटन |
महामानवाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सातार्यात अभिवादन |
परस्पर भूसंपादनाची महसूल विभागाची दांडगाई |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
कला उत्सवात डंका सातारा जिल्ह्याचा |
दिशाच्या अंत्यसंस्कारावेळी आजोबांचे हृदयविकाराने निधन |
सातारा जिल्ह्यातील ग्रीन पॉवर शुगर्स कारखान्याची ७४ लाखांची फसवणूक |
शुक्रवार पेठेत एकाची आत्महत्या |
युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |