मल्‍हारपेठमध्‍ये आढळल्‍या ४० हजारांच्‍या बनावट नोटा

by Team Satara Today | published on : 23 April 2025


मल्हारपेठ : दुकानदारांना शंभर व दोनशे, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा देणार्‍या एकास व्यापार्‍यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मल्हारपेठ (ता.पाटण) येथे हा प्रकार घडला असून, याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा बबन वायभासे असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे सुमारे 40 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. त्याचा साथीदार अंकुश वसंत आगाव पळून गेला आहे. दोघेही पिरेवाडी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथील आहेत.

मल्हारपेठ येथे मंगळावर, दि.22 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास येथील मुख्य बाजारपेठेतील दोन किराणा मालाच्या दुकानात व एका स्टेशनरी दुकानात शंभर व दोनशे रुपयाच्या नोटा देेऊन खरेदीसाठी संशयीत गेले होते. मात्र या नोटा बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍यांंनी पाठलाग करून दोघांना पकडले. येथील मुख्य चौकामध्ये त्यांना आणल्यानंतर याबद्दल विचारणा केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर काही व्यापार्‍यांनी त्यांना चोप दिला. यावेळी गर्दीचा फायदा घेत अंकुश आगाव पळून गेला. तर कृष्णा वायभासेला व्यापार्‍यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी त्याच्याजवळ शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या 40 हजार किमतीच्या बनावट नोटा आढळल्या. याप्रकरणी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मचले करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात दोनजणांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा
पुढील बातमी
दाभोलकर खटल्यामध्ये खोटे कथानक उभे केले गेले : प्रभाकर सूर्यवंशी

संबंधित बातम्या