सदर बझार येथील रिमांड होममधून १७ वर्षीय बालकाचे अपहरण; एका महिन्यात दुसरी घटना

by Team Satara Today | published on : 12 March 2026


सातारा : सदर बझार येथील बालनिरीक्षण गृह येथून १७ वर्षीय बालकाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिन्याच्या आत दोन बालकांना रिमांड होम येथून पळवून नेल्याची घटना घडली असल्याने सवाल उपस्थित होत आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सदर बाजार सातारा येथील एका हॉलमध्ये दि. 11 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील मलटण, कुंभारभट्टी येथील १७ वर्षाचा बालक मिळून आला नाही,सर्वत्र त्याचा शोध घेतला असता तो कोठेच मिळून न आल्याने कर्मचारी आशितोष सुनील साबळे (वय २८,रा. शिवथर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात भारतीय न्याय सहायता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक आणि अत्याचार; एकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
पुढील बातमी
सिमेंट पाईपमध्ये अडकून बुडाल्याने तीन कामगारांचा मृत्यू: सातारा जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना, मृत कामगार ओडिसातील रहिवासी

संबंधित बातम्या