भारतीय बौद्ध महासभेची विभागीय कार्यकारिणी जाहीर

by Team Satara Today | published on : 29 October 2024


सातारा : भारतीय बौध्द महासभा शाखा पाटण तालुकांतर्गत शाखा तारळे विभाग कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.विभागीय अध्यक्ष म्हणून बौद्धाचार्य विजय आत्माराम भंडारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

दीक्षाभूमी बुद्ध विहार तारळे, ता.पाटण येथे भारतीय बौद्ध महासभेच्या तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांच्या अध्यक्षतेखाली विजय आत्माराम भंडारे यांची तारळे विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली असून इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष - भिमराव सप्रे, सरचिटणीस - जगन्नाथ सावंत, कोषाध्यक्ष - मधुकर गायकवाड यांच्या नियुक्तीसह अनेक वर्षे विभागीय अध्यक्ष  भानुदास सावंत यांनी उत्कृष्ट असे काम केल्याने त्यांची वर्णी तालुका कमिटीवर करण्यात आली.

यावेळी बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार विजेते एन.एम. आगाणे (काका), मधुकर जगधनी व मिलीद कांबळे याशिवाय, तालुका पदाधिकारी घनश्याम कांबळे, रुपेश सावंत, विजय गायकवाड, राजाराम भंडारे, आत्माराम कांबळे,गौतम माने, बाजीराव न्यायनित, सुनिल माने आदींनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या. 

सदरच्या कार्यक्रमास सौ.लक्ष्मी आत्माराम कांबळे, आनंदा भंडारे, प्रकाश कांबळे, ॲड.राहुल भोळे, दगडु तांदळे, निवृती अडसुळे, आनंदा भंडारे, राहुल रोकडे, रामचंद्र गायकवाड, आबासाहेब भंडारे, धनाजी कांबळे, विजय माने, मनोज भंडारे, साहेबराव माने, आदित्य कांबळे आदी मान्यवरांसह धम्मबांधव मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आदर्श दिवाळी
पुढील बातमी
विधानसभा निवडणुकीसाठी 78 नामनिर्देशनपत्रे दाखल

संबंधित बातम्या