सोलापूर : कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, गांधी नगर (नांदेड) यांच्या वतीने तिसरे राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य संमेलन शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन विधान परिषद सदस्य आ. अमित गोरखे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत.संमेलनाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता 'चार हुतात्मा पुतळ्यापासून' निघणाऱ्या भव्य ग्रंथदिंडीने होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता 'ईरण्णा उपलप मंगल कार्यालय' येथे उद्घाटन समारंभ पार पडेल. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात विविध वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे: ग्रंथ प्रकाशन: सकाळी मान्यवरांच्या हस्ते विविध ग्रंथांचे प्रकाशन केले जाईल. परिसंवाद: दुपारी २:०० वाजता 'कर्मवीर भाऊराव पाटील यांची शैक्षणिक दृष्टी आणि सध्याचे शैक्षणिक धोरण' या विषयावर परिसंवाद होईल. याचे अध्यक्षस्थान. प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे भूषवतील. कविसंमेलन: दुपारी ३:०० ते ६:०० या वेळेत 'लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे महाकवी संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. यात राज्यातील अनेक नामवंत कवी आपला सहभाग नोंदवतील. या संमेलनाचा पुरस्कार वितरण आणि समारोप समारंभ सायंकाळी ६:०० वाजता समारोप समारंभ होणार असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांना 'राज्यस्तरीय कर्मवीर पुरस्कार' देऊन सन्मानित केले जाईल., ज्याचे अध्यक्षपद डॉ. श्रीपाल सबनीस भूषवतील आणि प्रमुख अतिथी म्हणून खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित राहतील.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव कार्ले यांनी सर्व साहित्यप्रेमींना या संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अॅड. बी. आर. कलवले आणि संयोजक भरतकुमार मोरे यांच्यासह संपूर्ण समिती प्रयत्नशील आहे.