सातारा : इरिगेशन कॉलनीतील आदित्यनगरी वॉल कंपाउंडच्या शेजारी अमीर सलीम शेख (रा.लक्ष्मी मंदिर जवळ, वनवासवाडी,सातारा) हा आढळून आला.त्याला २ वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून तडीपार केले असताना देखील पोलीस अधीक्षक सातारा किंवा महाराष्ट्र शासन यांच्या लेखी परवानगीशिवाय आदेशाचा भंग करून साताऱ्यात वावरत असताना पोलीस कॉन्स्टेबल सुहास कदम यांना आढळून आला.या प्रकरणी हद्दपरीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अमीर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करत आहेत.
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमीर शेखवर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 16 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा