प्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार

by Team Satara Today | published on : 28 September 2024


सातारा : प्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 सप्टेंबर रोजी बन्सीलाल बागाराम परमार राहणार मालाड वेस्ट मुंबई यांनी त्यांच्या गाडीचा चालक भगवान सिंग, कामगार मांगीलाल, अल्ताफ उर्फ बाबुलाल युसुफ खान, गोविंद हिरागर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्याकडे विश्वासाने हुबळी येथील जमीन खरेदी व्यवहारासाठीचे दोन कोटी 95 लाख रुपये मेंगलोर राजस्थान येथे घेऊन जाण्यासाठी पाठवले होते. मात्र संबंधितांनी आनेवाडी टोल नाक्यापासून पुढे लिंब फाटा सातारा दरम्यान परस्पर कुठेतरी जाऊन या रकमेचा अपहार केला आहे. अधिक तपास सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तांबे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदर बाजार मधून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
परताव्याच्या अमिषाने सुमारे 25 कोटींची फसवणूक

संबंधित बातम्या