सातारा : मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुजित देशमुख, शुभम परदेसी, ऋषी परदेसी (रा.प्रतापगंज पेठ, सातारा) यांच्या विरुध्द विशाल सुर्यकांत जाधव (वय 35, रा. प्रतापगंज पेठ) यांनी तक्रार दिली आहे. दुचाकी वॉशिंग करुन देण्यास वेळ झाल्याच्या कारणातून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.