सातारा : सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 11 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार असून त्यासाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान व 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तरी सदर निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व सौहार्दपूर्ण वातावरणात, कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण न होता पार पडावी व त्यावर आठवडा बाजाराचा परिणाम होवू नये, याकरीता मतदान केंद्रालगत भरणारे आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहे.
तरी या आदेशानुसार मतदान केंद्राजवळीच आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.