अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 April 2025


सातारा : अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील कमानी हौद येथे कोयता घेवून फिरत असणार्‍यावर शहर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हा दाखल केला. आकाश राजेंद्र भिंगारदेवे (वय 19, सध्या रा.खंडोबाचा माळ, सातारा. मूळ रा. ओंड ता.कराड) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी कोयता जप्त केला असून पोलीस विशाल धुमाळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही कारवाई दि. 14 एप्रिल रोजी करण्यात आली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी दोन ठिकाणी छापे
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या