नवी दिल्ली : नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जून महिन्यात अंतराळात गेले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच अडकून पडले आहेत. त्यांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी NASA आणि SpaceX ने चालवलेल्या स्पेस क्रू-8 मिशनचे पृथ्वीवर परत येणे हे पुढे ढकलण्यात आले आहे. ते पृथ्वीवर परतल्यानंतर स्पेस क्रू-9 मोहीम सुरू केली जाईल. फ्लोरिडामध्ये आलेल्या भीषण वादळामुळे या मोहिमेचे परतीचे काम बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे,असे नासातर्फे सांगण्यात आले आहे. त्यांना अनडॉक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हवामान अद्याप खूपच अस्थिर आहे असेही नासातर्फे नमूद करण्यात आले आहे. स्पेस क्रू-8 मिशनशी संबंधित अंतराळवीर अजूनही ISS मध्ये आहेत, त्यामध्ये भारतीय वंशाच्या नासाच्या अंतरालवीर सुनीता विल्यम्स आणि बुल विल्मोर हे दोघेही अडकले आहेत.
NASA आणि SpaceX चे Crew-8 मिशन हे क्रू-9 मिशनचे पूर्ववर्ती मिशन आहेय. अंतराळात कित्येक महिन्यांपासून अडकून पडलेले बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या अंतराळवीरांना ISS वरून पृथ्वीर परत आणणे हा त्याचा उद्देश आहे. नीता विल्यम्स आणि बुल विल्मोर यांना या वर्षी जूनमध्ये बोईंगच्या स्टायलिनर यानातून आठ दिवसांच्या मोहिमेसाठी ISSमध्ये पाठवण्यात आले होते.मात्र, स्टारलायइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे या यानाला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांशिवायच पृथ्वीवर परतावे लागले. त्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी पुढील मिशन सुरू करण्यात आले. फेब्रुवारी 2025 पर्यंत सुनीता विल्यम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर पर घेऊन येण्याचे क्रू-9 मिशनचे उद्दिष्ट आहे.
सध्या NASA आणि SpaceX हे क्रू-8 मिशनच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. जर परिस्थिती सुधारली तर ते आज रात्री 9:05 पर्यंत (भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी 6:35) अनडॉक करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. या आठवड्याच्या हवामानात अखेरीस त्यात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे क्रू-8 मिशनला पृथ्वीवर परत येण्यासाठी सुरक्षित वेळ मिळू शकेल.
क्रू-8 मिशनच्या क्रूमध्ये अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, जीनेट एप्स, माइक बॅरेट हे नासाचे तर रशियाच्या रोसकॉसमॉसचे अलेक्झांडर ग्रेबेनकिन यांचा समावेश आहे. सध्या, हा क्रू इंटरनॅशनल स्पेस स्टेशवनवर आहे. पण त्यांनी त्यांची दैनंदिन कामं सुरूच ठेवली आहेत. त्यामध्ये व्यायाम तसेच घरातील कामांचाही समावेश आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |