कराड : विधानसभा निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्जर्वर) यांची महत्त्वाची भूमिका असून ते भारत निवडणूक आयोगाचे कान व डोळे असतात. त्यांना थर्ड अंपायरची भूमिका पार पाडावी लागते, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.
कराड तहसील कार्यालयाच्या नियोजन सभागृहामध्ये सूक्ष्म निरीक्षकांच्या (मायक्रो ऑब्जर्वर) बैठकीस मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. पवार, मायक्रो ऑब्जर्वर नोडल अधिकारी पटेल, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, निवडणूक नायब तहसीलदार युवराज पाटील व कृषी पर्यवेक्षक बाबा तोरणे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हत्रे म्हणाले, ज्या मतदान केंद्रावर संवेदनशील अथवा तणावपूर्ण वातावरण आहे, तेथे सूक्ष्म निरीक्षक नेमले जातात. मतदान प्रक्रियेवेळी त्यांनी सर्व बाबींचे निरीक्षण व घडणार्या घटनांचे अवलोकन करून त्याच्या माहितीचा अहवाल ते जनरल ऑब्जर्वर यांना देतील. त्यानंतर जनरल ऑब्जर्वर तो आयोगाकडे पाठवतात.
मतदानाच्या वेळी घडणार्या अनुचित घटना, तक्रारीचे प्रसंग अथवा कोणत्याही बेकायदेशीर बाबींवर सूक्ष्म निरीक्षकांकडून आलेल्या अहवालाची दखल घेऊन आयोग कारवाई करत असते. त्यामुळे दिलेले काम, वेळ व अचूकता या तीन गोष्टी तुम्ही तंतोतंत पाळाव्यात, असे सुद्धा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले. कराड दक्षिण मध्ये 342 मतदान केंद्रावर 3000 कर्मचारी काम करणार आहेत. त्यासाठी तुम्ही 46 मायक्रो ऑब्जर्वर संवेदनशील केंद्रावर काम करणार आहात. तुमचे मतदान केंद्रावर संपूर्ण लक्ष असेल. सर्व कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत का? केंद्र सुरळीत सुरू झाले आहे का? याबाबतची माहिती तुम्हाला ठेवायची आहे. त्याचा 28 मध्ये रिपोर्ट तयार करून जनरल ऑब्जर्वरना द्यावयचा आहे, असेही अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.
विशेषत: बसेंट, शिफ्टेड किंवा डेथ मतदारांची लिस्ट केंद्राध्यक्षांकडे दिली जाईल. यापैकी मतदार मतदान करण्यास आला तर मतदान करू द्यायचे, मात्र त्याचे डबल आयडेंटीफिकेशन करायचे व त्याच्याकडून 14 नंबरचे पेडेव्हीट भरून घेऊन त्यावर त्याचा सही व अंगठा घ्यावयाचा आहे. प्रत्येक मतदाराने आयोगाने दिलेल्या 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक मूळ पुरावा घेऊनच मतदान करण्यासाठी आला आहे का? याचीही पडताळणी करावी. मॉक पोल शिवाय मतदान प्रक्रिया शून्य असते, हे मायक्रो ऑब्जर्वरनी लक्षात घेऊन कामकाज करावे. मॉक पोल नंतर सीआरसी घेतली आहे का? मतदान किती वाजता सुरू झाले व किती वाजता बंद झाले? यासह अन्य अनेक बाबींचे महत्त्वाचे रिपोर्टिंग ऑब्जर्वरनी करायचे आहे. तसेच पोलिंग एजंट मोबाईल घेऊन येणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी, असेही निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले.
कराड दक्षिणमध्ये दिव्यांग व्यक्ती व 85 वर्षांवरील मतदारांकरिता होम वोटिंगसाठी 15 टीम नेमल्या आहेत. 14 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबरला त्या टीम प्रत्यक्ष घरी जाऊन बॅलेट पेपरवर मतदान घेतील. कराड दक्षिणमध्ये 2300 दिव्यांग मतदार व सुमारे 3000 मतदार हे 85 वर्षावरील आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 342 पैकी 171 केंद्रे वेब कास्टिंग आहेत. त्यामुळे मतदान अधिकार्यांसह सर्वच प्रक्रियेवर मायक्रो ऑब्जर्वर यांचे लक्ष राहील. यासह अन्य अनेक महत्वाच्या बाबींबाबत मायक्रो ऑब्झर्वर यांना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन केले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |