रिमोटच्या कारची चोरी

by Team Satara Today | published on : 22 April 2025


सातारा : रिमोटच्या कारची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एमआयडीसी येथील शासकीय निवासस्थानासमोरुन अज्ञात चोरट्याने 6 हजार रुपये किंमतीची रिमोटची कार चोरुन नेली. ही घटना दि. 19 एप्रिल रोजी घडली आहे. याप्रकरणी श्रीकांत सोमनाथ राउत (वय 36, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी महिलेवर कारवाई
पुढील बातमी
अपघात प्रकरणी टँकर चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या