सातारा : तालुक्यातील शेंद्रे येथील मांगवडा येथून १३ वर्षीय बालक निखिल संदीप मोहिते याला अज्ञाताने कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे. ही घटना दिनांक ६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वडील संदीप किसन मोहिते (वय ४२ वर्ष रा. लक्ष्मीटेकडी सदर बाजार सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
शेंद्रे येथून १३ वर्षीय बालकाचे अपहरण; अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 12 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा