सोनगाव कचरा डेपो आगीप्रकरणी इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 March 2026


सातारा : सातारा नगरपालिकेच्या मालकीच्या सोनगाव येथील कचरा डेपोमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी निष्काळजीपणा केल्याबद्दल इको सेव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक पुनीत सिसोदिया (रा. इंदोर) यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ मार्चपासून कचऱ्याला आग लागल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार आहे. सातारा नगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख राकेश दत्तात्रय गलीयल (वय ५२, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निकम करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात गुरुवार पेठ येथील २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

संबंधित बातम्या