सातारा : श्वास हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर पार्किंग केलेली बजाज कंपनीची २० हजार रुपये किमतीची प्लॅटिना मोटरसायकल अज्ञात चोरट्याने दिनांक सात रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सादिक इब्राहिम शेख (वय ४६ रा. सैदापूर,सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सपकाळ करत आहेत.
साताऱ्यात श्वास हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर पार्किंग केलेलया दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 11 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा