01:04pm | Nov 28, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने सीमा भागात आयोजित केल्या जात असलेल्या २० व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी गुंफण अकादमी गेली दोन दशके महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील सीमा भागात साहित्य संमेलनांचे आयोजन करत आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांमधील मायमराठी विषयीच्या जाज्वल्य अस्मितेचा दीप तेवत राहावा म्हणून अकादमीतर्फे सातत्याने त्या भागात संमेलनांचे आयोजन केले जात असते. २० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन यावर्षी २२ डिसेंबर रोजी बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी रंगनाथ पठारे यांची निवड अकादमीने एकमताने केली आहे असे डॉ. चेणगे यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळे येथे १ जून १९५० रोजी जन्मलेले रंगनाथ पठारे महाराष्ट्राला प्रतिभावंत साहित्यिक म्हणून परिचित आहेत. कथा, कादंबऱ्या, समीक्षा, अनुवाद असे वैशिष्ट्यपूर्ण, सकस आणि चौफेर लेखन त्यांनी केले आहे. हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, सिंधी आणि कोकणी यांसारख्या काही भारतीय भाषांमध्ये त्यांच्या साहित्यकृतींचे भाषांतर झाले आहे. 'ताम्रपट' कादंबरीसाठी त्यांना १९९९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. याशिवाय अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे तसेच अन्य नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. २०२२ मध्ये त्यांना यूएस स्थित महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मराठी भाषेला अलीकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. हा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाने जी तज्ञ समिती गठीत केली होती त्याचे अध्यक्ष रंगनाथ पठारे हेच होते. अशा महान साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली सीमा भागातील हे गुंफणचे साहित्य संमेलन संपन्न होत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे चेणगे यांनी सांगितले.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |