सातारा : सातारा शहर परिसरातील राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी याने फिर्यादी विवाहित महिलेला गोडोली येथील घरी बोलावून व तेथील एका कॅफेमध्ये अत्याचार केल्याचे फिर्यादेत नमूद आहे.पीडित महिलेचे लग्न झाले असून डिवोर्सची प्रक्रिया सुरू आहे हे माहिती असताना देखील तिला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.यावेळी आरोपीने तिचे विडिओ शूटिंग करत ते व्हायरल करण्याची धमकी दिली.ही घटना जुलै २०२४ ते १० मार्च २०२६ दरम्यान वेळोवेळी घडली आहे. याप्रकरणी पीडितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल तारडे करत आहे.