सातारा : भुरके कॉलनी सदर बाजार येथे बेकायदेशीररित्या गांजा अंमली पदार्थाचे सेवन करताना अंकुश दिगंबर पवार (वय ३०, रा. आंबेडकर नगर) हा आढळून आला.
याप्रकरणी पोलीस शिपाई संतोष घाडगे यांनी फिर्याद दिली असून एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करत आहे.