01:08pm | Sep 28, 2024 |
सांगली : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ करणार आहेत. अंबाबाई देवीची यात्रा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त कवठेमहांकाळमध्ये रविवारी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीच्या मैदानातच महायज्ञ होणार असल्याचे याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य संघटक चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून उद्या बैलगाडी शर्यतीच्या मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ करणार आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी या बैलगाडी शर्यतीच्या मैदानावरच 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महायज्ञ घेत असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केलेय.
याबाबत चंद्रहार पाटील म्हणाले की, 29 तारखेला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी असे नाव दिलेले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. जिथे आम्ही शर्यतीचे आयोजन करणार आहोत तिथेच आम्ही महायज्ञ करणार आहोत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आम्ही महायज्ञाचे आयोजन केले आहे.
दरम्यान, अंबाबाई देवीची यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग गावच्या माळावरती बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री केसरी जनरल बैलगाडी, घोडागाडी, एकेरी घोडा स्पर्धेचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. देशिंग गावाच्या हद्दीत बोरगाव टोल नाक्याजवळ ही शर्यत होईल. बैलगाडी शर्यत मालकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली महिंद्राची थार गाडी ही विजेत्यासाठी आकर्षण असणार आहे. विजेत्यांचा गौरव थार गाडी देऊन केला जाणार आहे.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |