सातारा : बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सैदापूर, ता. सातारा येथील एका आठ वर्षीय बालिकेस पाईपने मारहाण करून तिला जखमी केल्याप्रकरणी अमित पांडुरंग सनदी रा. कृष्णा कोयना अपार्टमेंट, सैदापूर, ता. सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.
बालिकेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
म्हसवे येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या
March 21, 2026
मर्ढेकर यांनी कवितेला नवे परिमाण दिले : डॉ. माने
March 21, 2026
सातारा झेडपीमध्ये ‘डर्टी गेम’
March 21, 2026
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद
March 19, 2026