चोरीचा मोबाईल बाळगणाऱ्या एका विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 14 March 2026


सातारा : शहरातील शाहू चौक येथे शहर पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान जगन्नाथ राजाराम कांबळे (वय ४० वर्ष रा. रुई, ता. कोरेगाव) हे संशयितरित्या फिरताना आढळून आले. त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याकडे २५ हजार रुपये किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल आढळून आला.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्याच्या मालकी हक्काबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांना हा मोबाईल हँडसेट कुठून तरी चोरल्याची खात्री पटल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात दिले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबाजार येथील वस्ताद ग्राऊंडवरील जुगाराच्या अड्डावर छापा
पुढील बातमी
सातारच्या पारंगे चौकातून दुचाकीची चोरी; शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या