परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा

by Team Satara Today | published on : 17 September 2024


सातारा  :  दरवर्षी १ ते ७ सप्टेबर रोजी राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहासाठी एक घोषवाक्य सेट केले जाते.” सर्वांसाठी पौष्टीक आहार” ही या वर्षाची थीम आहे. परिचारीका प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी आहाराचे प्रत्यक्षिक व प्रदर्शन केले.

तसेच पूरक आहार, कुपोषित बालकाचा आहार, गरोदर व स्तनदा मातेचा आहार मधुमेह व उच्च रक्तदाबावर प्रतिंबधनात्मक आहार या विषयी जनजागृती केली. या कार्यक्रमासाठी परिक्षक म्हणुन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे, अतिरीक्त जिल्हाचिकीत्सक डॉ. राहुलदेव खाडे व डॉ संजीवनी शिंदे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक उपस्थित होते.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
'लाडक्या बहिणी' खूश, दाजींचे मात्र हाल'
पुढील बातमी
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

संबंधित बातम्या