सातारा : बॉम्बे रेस्टॉरंट येथील काटकर वडापावच्या बाजूला असलेल्या टपरीच्या आडोशाला शहर पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून एकूण ६४० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी शुभम सत्यवान कांबळे (वय २९, रा. विकासनगर सातारा) याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन आदमने करत आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; एका युवकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा