हॉटेल कामगाराने काउंटरमधून केली दीड लाखांची चोरी; बेळगावच्या एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 March 2026


सातारा : वाढे फाटा येथील हॉटेल रिव्हर्स अँड ओशियन मधुन हाऊसकिपिंग कामगाराने गल्ल्यातील रकमेची चोरी केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज कबुले (रा. कोनवाळ गल्ली, बेळगाव कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वाढे फाटा येथील रिव्हर्स अँड ओशियन हॉटेल मधील हाउसकीपिंग चे काम करणारा कामगार सुरज कबुले यांनी कॅश काउंटर तोडून त्यामधील एकूण १ लाख ४० हजार १०० रुपयांची रक्कम चोरून पलायन केले आहे.ही चोरी दि.९ रोजी रात्री बारा ते सकाळी १०:३० च्या दरम्यान केली असल्याची फिर्याद हॉटेल मॅनेजर गणपत म्हातारू पेडणेकर (वय ३५, रा. आंबेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन; वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने शासन निर्णय जारी
पुढील बातमी
सदरबाजार येथील वस्ताद ग्राऊंडवरील जुगाराच्या अड्डावर छापा

संबंधित बातम्या