कूपर कॉलनीतून कारची चोरी

by Team Satara Today | published on : 03 September 2024


सातारा : सातारा शहरातील सदर बाजार कूपर कॉलनीतून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 ते 2 सप्टेंबर दरम्यान वीरेंद्र राजन धुमाळ रा. कूपर कॉलनी, सदर बाजार, सातारा यांच्या राहत्या बंगल्यासमोर पार्क केलेली त्यांची क्रेटा कंपनीची, तीन लाख रुपये किंमतीची कार क्र. एमएच 04 एचयु 1462 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सव काळात प्लाजमा, लेझरबिम लाईटला पूर्णतः बंदी
पुढील बातमी
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

संबंधित बातम्या