सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने एका दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका येथून अज्ञात चोरट्याने एमएच 11 सीएम 4438 या क्रमांकाची दुचाकी चोरी केली. ही घटना दि. 25 नोव्हेबर रोजी घडली असून गौरव धनंजय यादव (वय 22, रा. देगाव) या युवकाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा तालुका पोलिसांचा शिवथर गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा
December 13, 2025
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल.
December 13, 2025
जैतापूर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन परप्रांतीयाची आत्महत्या
December 13, 2025