सातारा शहरात पतीसमोर पत्नीचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 16 March 2026


सातारा : सातारा शहरातील उपनगरात पतीसमोर पत्नीच्या कमरेला हात लावून विनयभंग करण्यात आल्याची घटना दि १५ रोजी घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अर्जुन रामा खवळे (रा. नामदेववाडी झोपडपट्टी सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,अर्जुन हा पीडित फिर्यादी महिलेच्या जवळ येऊन तिच्या अंगाशी झटू लागला. यावेळी त्याने महिलेच्या कमरेवर हात ठेवून कंबर जोरात दाबल्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न निर्माण झाली. महिलेच्या पतीने आरोपीस जोरात ढकलून दिले व पत्नीच्या कमरेस हात का लावला अशी विचारणा केली. 

यावेळी चिडून जाऊन अर्जुन खवळे याने फिर्यादीच्या पतीस शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली व त्यांनतर ८:४५ वाजता समर्थ टॉकीज समोर आरोपीने दुचाकी गाडी आडवी मारून फिर्यादी महिला आणि पतीस थांबवून फिर्यादीच्या पती यांना धक्काबुक्की करत कोयत्याने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित दाम्पत्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वरे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझार येथील आंब्याच्या झाडाच्या बागेत गांजाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
करंजे पेठ येथे एकता कॉलनीत खड्डे काढण्यावरून वाद; एकासह तीन कामगारांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या